पणजी, मे २०२५ : सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. या सूचनेत नागरिकांना शांतता राखण्याचे, सतर्क राहण्याचे व जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, संशयास्पद हालचाली किंवा व्यक्तींबाबत कोणतीही माहिती आढळल्यास ती त्वरित गोवा पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक ११२ वर कळवावी.
त्याचप्रमाणे, अफवा, अप्रमाणित फोटो किंवा बातम्या सोशल मीडियावर शेअर करू नयेत**, कारण यामुळे गैरसमज पसरू शकतात व समाजात भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते.

लष्करी घडामोडी, ठिकाणे किंवा जवानांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नयेतअसे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून भासवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीबाबत माहिती मिळाल्यास cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करावी किंवा **सायबर हेल्पलाइन १९३०वर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

गोवा पोलिसांनी नागरिकांना एकजुटीने व जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले असून, कुठल्याही अधिकृत माहितीची पुष्टी झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट शेअर न करण्याची विनंती केली आहे.