पणजी, : पहलगाम हल्ल्यानंतर गोव्याच्या दोन पर्यटक गटांनी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी प्रवास केला होता. मात्र, अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे हे दोन्ही गट सध्या तिथे अडकले आहेत. एकूण ३० गोमंतकीय या संकटात सापडले आहेत.

यापैकी १५ जणांचा एक गट अमृतसरमध्ये अडकलेला आहे. तेथील विमानतळ बंद असल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. हे पर्यटक एका खासगी टूर ऑपरेटरमार्फत प्रवास करत होते.

या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता गोव्याच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षा सल्ला जारी केला आहे

पर्यटकांच्या कुटुंबीयांनी संयम बाळगावा आणि परिस्थितीवर संबंधित यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचा दिलासा देण्यात आला आहे. प्रशासन आणि पर्यटन खात्याकडून या पर्यटकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे.