पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते आणि समर्थक हातात तिरंगा घेऊन या यात्रेत सहभागी झाले. त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या जवानांना मानवंदना दिली व त्यांच्या योगदानाचे गौरवगान केले.
या यात्रेमागचा उद्देश गोमंतकीय जनतेमध्ये देशभक्तीची भावना बळकट करणे आणि भारतीय संरक्षण दलांप्रती एकात्मता व्यक्त करणे हाच होता, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.