दाबोळी : येथील विमानतळावर हवाई हल्ल्याच्या प्रसंगावर आधारित एक मॉक ड्रिल (आपत्कालीन सराव) राबविण्यात आली. या सरावात २० नागरिक अडकलेले असल्याचे दर्शवण्यात आले होते आणि त्यांची यशस्वी सुटका करण्यात आली.

या सरावाची कोऑर्डिनेटर म्हणून मुरगावचे उपजिल्हाधिकारी श्री. भगवंत कारमळी यांनी जबाबदारी पार पाडली. या मोहिमेत विविध विभागांचे व यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले होते व त्यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई पार पाडली.
या मॉक ड्रिलचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तयारी, समन्वय आणि प्रतिसाद क्षमता तपासणे हा होता. हवाई हल्ल्यासारख्या आपत्तीत कशी तत्परता दाखवावी, याचा प्रत्यय या सरावातून आला.

प्रशासनाकडून यापुढेही अशा सरावांची नियमित आयोजन करून सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.