या सरावात सिव्हिल डिफेन्स, एनसीसी, एनएसएस, आपदा मित्र, स्वयंसेवक आणि विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण मोहिमेत उपजिल्हाधिकारी (DRO) श्री. ईश्वर मडकैकर यांनी 'इन्सिडेंट कमांडर' म्हणून जबाबदारी सांभाळली.
या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितींमध्ये विविध यंत्रणांमधील समन्वय, त्वरित प्रतिसाद क्षमता आणि नागरिकांचे रक्षण करण्याची तयारी तपासणे हा होता.
या प्रकारच्या सरावांमुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.