पणजी : गोवा सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटी धोरण २०२१ अंतर्गत मोठा निर्णय घेतला असून, २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणींपैकी ३०% वाहने इलेक्ट्रिक असतील, असा महत्त्वाकांक्षी उद्देश समोर ठेवण्यात आला आहे.

फक्त रस्त्यांवरच नाही, तर  सागरी वाहतुकीतही मोठा बदल  घडणार आहे. फेरी सेवा अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी ५०% बोटी इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे.

या धोरणामुळे  ४००० ते ५००० स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचे दरवाजे उघडणार आहेत. वाहन दुरुस्ती, चार्जिंग स्टेशन, बॅटरी सेवा, व व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात मोठी भरती अपेक्षित आहे.

या क्रांतीतून हजारोंना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून, गोमंतकीय तरुणांना नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे.