फोंडा: कोडार-निरंकाल फोंडा येथे सोमवारी (५ मे) रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत मेव्हण्याने आपल्या दाजीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, फोंडा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
खून झालेल्याचे नाव दीपक तिर्की (२५, मूळ रा. झारखंड) असे असून, डॅवीड टोपी (३६, मूळ रा. झारखंड) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोघेही झारखंडचे रहिवासी असून, फोंडा परिसरातील एका शेतावर मजूर म्हणून काम करत होते.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री हे दोघे दारूच्या नशेत असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वादाचा राग मनात ठेवून डॅवीड टोपी याने दीपक तिर्की याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दीपकचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा
नराधम सावत्र बापाची विकृत क्रूर६ वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करून नाचवले