या थरारक अंतिम सामन्यात RCB च्या संघाने उत्कृष्ट संघनिष्ठा, अचूक गोलंदाजी आणि संयमित फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. अनेक वेळा अंतिम फेरी गाठूनही विजेतेपद हुलकावणी देत होते, पण यंदा त्यांनी त्या सर्व अपयशांना मागे टाकत चमकदार यश संपादन केले.
या विजयानंतर RCB चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, आणि सोशल मीडियावर 'Ee Sala Cup Namde' हे ब्रीदवाक्य अखेर खऱं ठरल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे.