या सामंजस्य कराराला जीसीएने क्रिकेटच्या विकासासाठी एक ऐतिहासिक टप्पा असे संबोधले आहे. जीसीएच्या म्हणण्यानुसार, या करारामुळे चिकली मैदानात आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उभारण्यास मदत होणार असून, यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंना अधिक चांगले प्रशिक्षण आणि खेळण्याच्या संधी मिळतील.
जीसीएचे पदाधिकारी आणि कार्यकारिणीने या कराराचे स्वागत करत सांगितले की, ही भागीदारी केवळ मैदानापुरती मर्यादित नसून, ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे जी गोव्यातील क्रिकेट खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची तयारी करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल
स्थानिक क्रिकेटसाठी नवे पर्व
या करारामुळे स्थानिक क्रिकेट अकादम्या, युवा प्रशिक्षण शिबिरे आणि स्पर्धा आयोजित करण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच, विविध वयोगटातील क्रिकेट संघांना (अंडर-१४, १६, १९, २३ आणि सीनियर) या मैदानावर नियमित सराव करता येईल.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभाला सचिव शांबा देसाई, सहसचिव रूपेश नाईक ,
क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक . अरविंद खुटकर , इर्विन कॉर्डो उपस्थित होते.