साखळी : गोव्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मला दत्तगुरूंचा आशीर्वाद हवा आहे. जनतेची सेवा करणे हेच माझे मुख्य ध्येय असून त्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथील श्री दत्त मंदिरात गुरुवारी सकाळी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्या जनसेवेच्या वचनबद्धतेला बळकटी मिळावी यासाठी दत्तगुरूंचे आशीर्वाद मागितले. तसेच गोव्यातील जनतेच्या शांती, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत मंदिरातील धार्मिक विधींमध्ये सहभागी होत दर्शन घेतले. मंदिर परिसरात उपस्थित भाविकांशी त्यांनी संवाद साधला व त्यांचे शुभेच्छाही स्वीकारल्या.