पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज शिरगाव येथे असलेल्या प्रसिद्ध देवी लईराई दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गोमंतकीय जनतेच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
मुख्यमंत्रींसोबत आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. देवी लईराईची यात्रा हा गोव्यामधील एक महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव मानला जातो. यात्रेदरम्यान हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी शिरगावात येतात.
मुख्यमंत्री सावंत यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत, राज्यात सर्वत्र शांतता, विकास आणि सामाजिक ऐक्य टिकून राहो, अशी प्रार्थना केली.