पणजी : आरोग्य खात्यातील गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, २ आरोग्य निरीक्षक आणि ४ स्वच्छता निरीक्षक अशा एकूण ६ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

या अधिकाऱ्यांनी केवळ भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला नाही, तर नागरिकांना ब्लॅकमेल केल्याची माहिती मिळाली आहे. अशा कर्मचाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे,असे राणे यांनी स्पष्ट केले. या अधिकाऱ्यांची नावे सध्या गोपनीय ठेवण्यात आली असून, पुढील आठवड्यात ती जाहीर केली जाणार आहेत.
आरोग्य खात्यातील ही कारवाई म्हणजे शिस्तभंग आणि भ्रष्टाचाराविरोधात उचललेले मोठे पाऊल मानले जात आहे.
लोकसेवेतील शुद्धता राखण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे,असेही आरोग्यमंत्री राणे यांनी नमूद केले.