दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील बकरवाला आनंदधाम आश्रमातील सनातन संस्कृती जागरण महोत्सवात हजेरी लावली. या व्यासपीठावरून त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आणि देशाच्या सुरक्षा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

संरक्षण मंत्री म्हणाले, "संरक्षण मंत्री म्हणून माझ्या सैनिकांसह देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात तुम्हाला जे हवे तेच होईल. देशाविरोधात कारवाय करणाऱ्यांना योग्य उत्तर देणे, ही माझी जबाबदारी आहे."

त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, "तुम्ही सर्वजण आपल्या पंतप्रधानांना चांगले ओळखता, त्यांच्या कामाच्या शैलीची आणि दृढनिश्चयाची माहिती आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला जे हवे आहे, तेच होईल," असे सूचक विधान केले.

सिंह यांचे हे वक्तव्य विशेषतः जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे, ज्यामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचे कट्टरवादी गटांवर कारवाई केली आहे.

त्यांच्या या वक्तव्यातून पाकिस्तानला एक ठाम संदेश जातो की, भारत आपल्या सुरक्षा आणि हितासाठी कडक निर्णय घेण्यास सिद्ध आहे.